Ajit Pawar : अजित पवार नाराज होते की आजारी? खुद्द त्यांनीच दिली माहिती, म्हणाले, राजकीय आजार..
Ajit Pawar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात चर्चेत आला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्याची माहिती समोर आली. अजित पवारांचे आजारपण खरे की खोटे याची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली.
या चर्चांवर अजित पवारांनी पहिल्यांदाच आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. ‘मी लेचापेचा माणूस नाही. गेले १५ दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मते गेल ३२ वर्षे स्पष्टपणे मांडत असतो’, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. तर अमित शाहांना तक्रार करण्यासाठी भेटलो नसल्याचे स्पष्टीकरण या वेळी अजित पवारांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या आवारात सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवारांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या. Ajit Pawar
बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. मराठा समाजाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा आणि मराठा समाजातील तरुणांना प्रशिक्षण मिळावे यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.