Ajit Pawar : लोकसभेला मी चूक केली, अन् आता पवार गटाने युगेंद्रला उभा करून चूक केली, आता बारामतीकर ठरवतील, अजित पवारांचे सर्वांत मोठं वक्तव्य…
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून अर्ज भरला. सातव्यांदा ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. अजित पवार यांनी बारामतीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला.
दरम्यान, राष्ट्रवादीत फुटीनंतर पुतण्या अजित पवार यांना विधानसभेत शह देण्यासाठी काका शरद पवार यांनी अजित पवारांच्याच पुतण्याला उमेदवारी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी म्हटलं की, बारामतीत मी चांगल्या मतांनी विजयी होईन. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. लोकसभेला पत्नीला उभा करून मी चूक केली. आता तीच चूक विधानसभेला युगेंद्रला उभा करून शरद पवार गटाने केली आहे. Ajit Pawar
मी माझ्या पत्नीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरवलं होते. आमची ती चूक होती. यावेळी त्यांनीही तीच चूक केलीय. आता बारामतीची जनता ठरवेल असंही अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी असं करायला नको होतं. पण त्यांनी चूक केलीय. आता मतदार याबद्दल योग्य निर्णय घेतील असं अजित पवार यांनी म्हंटले आहे