Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांनी दिल सडेतोड उत्तर; म्हणाले, आरोप करणाऱ्यांचे डोके…

Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या निकालाकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.

तसेच रोहित पवारांनी ट्विट करत बारामतीत भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केलाय. अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आरोप फेटाळलेत. आरोप करणाऱ्यांचे डोके फिरल्याचा पलटवार अजित पवारांनी केला आहे. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. Ajit Pawar

अजित पवार म्हणाले, सध्या ते आमच्यावर आरोप करत आहे. मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप करू शकतो. परंतु मी आरोर करणार नाही. ते काहीपण आरोप करत सुटले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपाला माझ्या दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही. असे ते म्हणाले आहे.