Ajit Pawar Group : अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का! आता शरद पवार यांचा फोटो वापरण्यास केली मनाई, जाणून घ्या…

Ajit Pawar Group : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

अशातच आता सुप्रीम कोर्टाने अजित दादा गटाला मोठा दणका दिला आहे. राजकीय फायद्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवार गटाने केला होती. या संदर्भात शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेतली होती. आता याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नावावर दावा करण्यात आला होता.

मात्र राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. Ajit Pawar Group
शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली आहे.
यावेळी खंडपीठाने अजित पवार गटाला शनिवारपर्यंत सदर याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. तसेच याची पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, ‘आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात मग त्यांचे छायाचित्र का वापरावे? आता तुमची ओळख घेऊन जनतेसमोर जा. तुमची आता स्वतंत्र ओळख असल्याने तुम्ही त्यासोबत पुढे जा. शरद पवार यांचे नाव, छायाचित्रे वापरली जाणार नाहीत, असे स्पष्टपणे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले आहे. यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
