अजित पवार यांनी पोलिसांची तीन एकर जागा खाजगी बिल्डरला दिली ! विरोध करुनही जमिन बिल्डरला दिल्याचा आरोपाने खळबळ !!

Meera Borawankar मुंबई : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त (Former Pune CP) मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात दादांनी येरवड्यातील पोलीस खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.

ही जमिन पोलिस खात्याला न देता ती जमीन बिल्डरला दिल्याचा आरोप केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान मिरा बोरवणकर यांच्या आरोपानंतर विरोधकांनी अजित पवार यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असतानाचे हे प्रकरण आहे. २०१० मधील या प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून केला आहे. हे पुस्तक रविवारपासून बाजारात येत आहे. या पुस्तकात अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप करण्यात आला आहे.

येरवडा येथे पोलिसांची असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अजित पवार यांचे थेट नाव घेतले नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असे त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होते, असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे