Ajit Pawar : सुप्रिया सुळेंबाबतच्या प्रश्नावर अजित पवार का भडकले? म्हणाले, सुप्रिया असेल तर..
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना सुळेंच्या विरोधात उभं करणे चूक होती आणि रक्षाबंधानाच्या कार्यक्रमावरून अजित पवार यांनी केलेली वक्तव्ये सध्या चर्चेला आली आहे. अशातच आज पुण्यात अजित पवारांना सुप्रिया सुळे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर ते भडकल्याचं दिसून आले आहे.
काही दिवसांपासून त्यांना सातत्याने याबाबत प्रश्न केले जात आहेत, अशातच आज पुण्यात सुळेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते भडकल्याचं दिसून आलं. मी जाईल रक्षाबंधनाला तिकडे सुप्रिया असेल तर तिला पण भेटेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये एकाच घरातील सदस्यामध्ये सामना पाहायला मिळाला. यावेळी महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीत उतरल्या होत्या. यामध्ये सुळेंचा मोठा विजय झाला.
बारामतीमधील सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही माझी चूक होती, असे अजित पवार यांनी म्हटलं. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. Ajit Pawar
तर यावेळी रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्न अजित पवारांना त्यांच्या कबुलीवेळी मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे अजित पवार यांनी म्हटले होते.