Ajit Pawar : नॉट रिचेबल अजितदादा अखेर नेटवर्कमध्ये, गायब होण्याचे कारण आलं समोर, जाणून घ्या…

Ajit Pawar : रविवारी महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे.
तसेच आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचा विस्तारही झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाराजीनाट्य सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेदेखील मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते.
नॉट रिचेबल असणारे अजितदादा आज अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. आपल्या शासकीय निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. Ajit Pawar
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या जवळपास १३ दिवसांनी सत्ता स्थापन झाली. महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असल्याची चर्चा होती. सत्ता वाटपाचा घोळ सुरू असल्याने सरकार उशिराने स्थापन झाले.
निवडणूक निकालाच्या २० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता, हिवाळी अधिवेशनात अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले. त्यामुळे अजित पवारच नाराज आहेत का, याची चर्चा रंगली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार मागील ४८ तासांपासून कुणालाच भेटले नाहीत. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. अजित पवार हे दिल्लीत असल्याची चर्चा होती. मात्र, राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.