Ajit Pawar : ‘कचाकचा’ या शब्दावर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले, मी ग्रामीण भाषेत…


Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीमुळे दिग्गज नेते मंडळी प्रचार सभांचा धडाड घेत आहेत. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मागे नाहीत. तर अजितद पवार भाजप आणि शिंदे गटासोबत युतीमध्ये असल्याने ते स्टार प्रचारक आहेत.

तसेच अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी जाणले जातात. मात्र हा स्वभाव कधी कधी अडचणीतही आणू शकतो. याचे ताजं उदाहरण म्हणजे अजित पवारांनी इंदापूरमध्ये केलेलं वक्तव्य.

आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांना ट्रोल करण्यात आलं. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला.

‘एका शब्दाचा उगाच बाऊ करु नये, मी ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला, असं म्हणत अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते पुण्यातील सिंहगड रोडवरील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.Ajit Pawar

काल इंदापूरात डॉक्टरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मी गमतीने ते वक्तव्य केलं. त्यानंतर ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला जातो. त्यामुळे मी ते बोललो. यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. या कार्यक्रमात सगळे प्रतिष्ठित डॉक्टर्स होते, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे.

अजित पवार आज सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या फक्त सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. बाकी उमेदवारांचे अर्ज नंतर दाखल करण्यात येणार आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!