अजित पवारांनी मतदानाआधी बॉम्ब फोडला ; ती फाईल उघडली असती तर आत्ता….,भाजप-युती सरकारबाबत गौप्यस्फोट

पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेच्या जुन्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला आहे. १९९५ च्या युती सरकारने ‘पार्टी फंडा’साठी पुरंदर उपसा सिंचन योजनेचा खर्च चक्क १०० कोटी रुपयांनी फुगवला होता, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे.

राज्यातील 29 महानगरपालिका साठी उद्या मतदान होत आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याचा मोठा बॉम्ब फोडला आहे. ते म्हणाले, 1999मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जलसंपदा विभागाची फाईल त्यांच्याकडे आली होती. त्यावेळी पुरंदर उपसा योजनेचा अंदाजित खर्च 330 कोटी रुपये दाखवण्यात आला होता.
सरकारच्या या खर्चावर शंका आल्याने अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पुन्हा फेरसर्वेक्षण करून नवीन एस्टिमेट काढण्याचे आदेश दिले. वास्तविक खर्च 200 कोटी असताना मागील सरकारने 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी वाढवण्याचा आरोप अजित पवार यांनी केला. ती फाईल उघडली असती तर आता हाहाकार माजला असता असं मला त्यांनी जुन्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. त्यामुळे ऐन निवडणुकीत राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असताना, अजित पवारांनी जुन्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उकरून काढल्याने महापालिका निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. “तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता, पण तुमच्या काळात काय चालले होते, हे या फाईल्स सांगतात,” असा स्पष्ट संदेश अजित पवारांनी या निमित्ताने दिला आहे.