Ajit Pawar : शाळेच्या उद्घाटनास जमले नाही, पण निवासस्थानी भेटीला आलेच! अजित पवार यांची व्यस्त निवडणूक दौऱ्यात एल.बी. कुंजीर यांच्या निवासस्थानी भेट ‘यशवंत’ कारखान्यावर महत्त्वाचे भाष्य..!!
Ajit Pawar उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी तपासण्यासाठी संचालक मंडळास सूचना दिल्या आहेत. अचारसंहितेपर्यंत ऑडिट , संस्थेची सर्व यांत्रिक दुरुस्ती अहवाल तयार ठेवण्यासहीत बँकेच्या वित्तीय लेखाजोखा तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर केंद्राच्या एनसीडीसी अर्थिक पॅकेज मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः हा राज्य सरकारनार्फत प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळती( ता.हवेली)येथील उद्योगपती एल.बी.कुंजीर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना ‘यशवंत’ बाबत निर्णय घेताना उपस्थित संचालक मंडळाला सूचना दिल्या आहेत. उद्योगपती एल.बी.कुंजीर यांनी स्वखर्चाने वळती गावात जिल्हा परिषदेच्या अद्यावत प्राथमिक शाळेची उभारणी केली आहे. परंतु अचारसंहितेपर्यंत या प्राथमिक शाळेच्या नियोजित उद्घाटनास अजित पवार यांना उपस्थित राहता न आल्याने त्यांनी रविवारी (दि.७) एल.बी.कुंजीर यांच्या वळती निवासस्थानी भेट दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी अजित पवार यांनी संवाद साधला. Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, सहकारी साखर कारखानदारी चालविता चिकाटीची भूमिका घ्यावी लागत आहे. राज्यातील अनेक सहकारी कारखानदारी चालविणारे जेष्ठ नेतेमंडळी स्वतः हा भाजी भाकरी घेऊन कारखान्यात येऊन काम करणारी मंडळी मी पाहिली आहेत. या मंडळींनी शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याने कारखानदारी शेतकरी हिताची राहिली आहे. यशवंत कारखान्यात नवीन संचालक मंडळापुढे मोठे आव्हान आहे. हे आव्हान घेऊन संचालक मंडळाला काम करावे लागणार आहे.
संचालक मंडळ यापूर्वी भेटीला येऊन त्यांना योग्य सूचना दिल्या आहेत. तरीही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे या कारखान्यासाठी एनसीडीसी चे अर्थिक पॅकेज मिळविण्यासाठी अचारसंहितेनंतर निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. एल.बी.कुंजीर यांनी मांडलेल्या पुरंदर उपसा योजनेतून शिंदवणे, वळती गावांना शेतीला पाणी मिळणे, वळती गावातील देवस्थान जागेत पर्यटन स्थळाला मान्यता देणे, वळती वीजउप केंद्राची क्षमता वाढवून वीजेचा स्थिर दाब देण्याची मागणी तसेच नवीन मुठा कालव्यात शेती आवर्तन बंद झाल्यास कालव्यात आरक्षित पाणी शेतीला देणे त्यासाठी आवश्यक उपाययोजनांची मागणी त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली.
यावेळी यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश घुले, महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे ,तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर उपस्थित होते.