बीडचे पालकमंत्री होताच अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय! रात्री दीडची वेळ 9 हजार सह्या, नेमकं प्रकरण काय?
बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्री म्हणून नुकतीच निवड करण्यात आली. त्यांनी पालकमंत्री म्हणून बीडाला पहिलाच दौरा झाला पण तो ही मध्यरात्री दीड वाजता. मात्र याच दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तब्बल नऊ हजार सह्या करत जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
हे आदेश अजितदादांनी दिले होते, असं बोललं जातं आहे. अविनाश पाठक देखील आक्रमक दिसत आहेत. अजितदादा पवार लातूरहून जालन्याकडे नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना ते बीडला आले. यावेळी त्यांनी आढावा घेतला. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला.
यावेळी अनेक अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री बीडमार्गे पुढे जाणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी तयारी केलेली होती. अजित दादांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली, जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर ते पुढे गेले.
यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अवैधरित्या वाळू उपसा करुन तस्करी करणाऱ्या वाळू माफियांना दोन हजार नोटीसा बजावल्या आहेत. यासाठी त्यांनी तब्बल नऊ हजार सह्या केल्या. यामुळे अजित पवार यांनी याबाबत सूचना केल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार पालकमंत्री होताच जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे यापुढे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या कुठलीच कामे होणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत येणाऱ्या काळात बीडची परिस्थिती बदलेल असेही सांगितले जात आहे. नुकताच वाळू माफियांना नोटीस बजावून दंड ठोठावला होता.
असे असताना माफियांनी या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन नोटीसला आव्हान दिले होते. जिल्हा प्रशासनाला म्हणणे मांडण्याचे आदेश जारी केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने कोर्टातच सदरील दंडाच्या नोटीसा मागे घेत असल्याची माहिती दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.