Ajit Pawar : राज्याच्या उज्वल भवितव्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय! नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाची धमक, उरुळी कांचन येथील सभेत अजित पवार यांचे स्पष्टीकरण..!!


जयदिप जाधव

Ajit Pawar उरुळीकांचन : आम्ही भाजप सोबत युती केली म्हणून गद्दारी ठरते , तर मग २०१४ साली भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय,२०१७ शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेऊन राष्ट्रवादीला सत्तेत घेण्यासाठी निर्णय तसेच २०१९ ला भाजपशी युती करण्यासाठी शपथविधी पाठविण्याचा निर्णय हे पक्ष नेतृत्वाला कोणत्या विचारधारेत, तत्वात बसत होते. तर आम्ही राज्याच्या विकासासाठी भाजपशी हातमिळवणी करुन सत्तेत सहभागी होण्याचा जनतेच्या हिताचा ठरणार असेल तर हा निर्णय कसा चुकीचा ठरु शकतो असा आरोपउपमुख्यमंत्री अजित पवार केला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील आयोजित प्रचार सभेत बोलत होते. याप्रसंगी उमेदवार शिवाजी आढळराव पाटील, प्रदिप कंद, मंगलदास बांदल, रोहिदास उंद्रे, सुरेश घुले, दिलीप वाल्हेकर, सुभाष जगताप, महादेव कांचन, राजाराम कांचन आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. देश नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचे शिखरावर आहे. नरेंद्र मोदी यांनी देशभरात विकासाचा सिलसिला सुरू केला आहे. तो तिसऱ्या टर्ममध्ये पुढे सुरू ठेवायचा आहे. मोदी यांच्या उज्वल भारत देशाचा एक भाग म्हणून राज्याचा विकास महत्त्वाचा आहे.

या हेतूनेच आम्ही भाजप शी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण या भागातून एक खासदार दिल्लीत पाठविला तर निश्चित आपल्याला भागातील कामे होण्यास त्याचा उपयोग होणार आहे. सत्ता नसेल तर कामे होणार नाही, त्यामुळे सत्ता महत्त्वाची आहे. पूर्व हवेलीतील वाघोली, उरुळीकांचन वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वातोपरी भरीव निधी या ठिकाणी देईल.यासाठी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा खासदार निवडून द्यावा असे आवाहन अजित पवार यांनी केले. Ajit Pawar

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, लोकसभेत तीन टर्म खासदार म्हणून काम केल्याने पुणे- नाशिक रेल्वेचा मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रात भरीव निधी मतदारसंघात आणू शकलो. त्याचबरोबर पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षात खासदार अमोल कोल्हे यांनी कोणते काम पूर्ण केले, पुणे -सोलापूर महामार्गाचा वाहतुक कोंडी, पुणे -नगर महामार्गावर वाहतुक कोंडीसाठी काय काम केले. संसदेत दोन चार भाषणे चांगली केली म्हणून विकास होत नाही. अभिनय व प्रत्यक्षात लोकसेवा या कृतीत मोठा फरक आहे. भविष्यात हवेलीतील विकासकामांसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

वळसे पाटलांना मंत्री केली म्हणून हा गडी रुसला..

अजित पवार यांनी सभेत आमदार अशोक पवार यांचा सभेत चांगलाच समाचार घेतला. आम्ही या गड्याला निवडणूक आणला आता आमची भावकी म्हणते, घोडगंगा कारखाना मी बंद पाडला. यांच्याकडे २५ वर्षे कारखाना एकहाती असताना कारखाना मी मदत केली नाही म्हणून म्हणतोय. परंतु कारखाना यांच्या चुकीने बंद पडला आहे. शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय हा दिलीप वळसे पाटलांना मंत्रीपद दिले म्हणून हा गडी बिथरल्याचा खुलासा अजित पवार यांनी सभेत केला आहे.

बांदलांकडून रोहित पवारांचा समाचार..

सभेत मंगलदास बांदल यांची जोरदार फटकेबाजी चांगलीच चर्चेची ठरली. बांदल यांनी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकांवर रोहित पवार यांना चोख प्रतिउत्तर दिले. अजित पवार यांच्या जिवावर आमदार व व्यवसाय धाटणाऱ्यांनी अजित पवार यांच्यावर बोलूच नये. आपली अंडीपील्ली दादांना माहिती आहे. रोहित पवार आपण ज्या भाषेत माझ्याविरुद्ध बोलला त्याचे उत्तर कुठल्याही त्याच भाषेत मी देण्यास मी समर्थ असल्याचे बांदल यांनी अजित पवार यांच्या पुढे सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!