Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेर पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी भूमिका करत मराठा आंदोलकांनी ‘मातोश्री’ निवास्थाना बाहेर आंदोलन केले. यानंतर मराठा आंदोलकांनी आपला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वळवला.

मराठा आंदोलक फडणवीस आणि अजितदादांच्या निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी रोखले असता पोलिस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पक्षाची भूमिका विचारण्यासाठी अजितदादांकडे जात आहोत.

आम्हाला पोलिस परवानगीची गरज नाही. आम्ही काय चो-या करायला जात नाहीत. अजितदादांना निवेदन द्यायचे आहे. रीतसर आम्ही त्यांना भेटणार आहोत, असे केरे-पाटलांनी पोलिसांना सांगितले आहे. Ajit Pawar

तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मराठा आंदोलक रमेश केरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते ‘सागर’ आणि ‘देवगिरी’ बंगल्याकडे निघाले होते. पण, पोलिसांनी रमेश केरे-पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना गिरगाव येथे रोखले.
दरम्यान, आपले निवेदन पोहोचविण्याची व्यवस्था करू. पण, पुढे जाता येणार नाही. ट्रॅफिक जॅम होत आहे. त्यामुळे तुम्ही येथे थांबा, अशी विनंती पोलिसांनी केरे-पाटलांना केली आहे.
