Ajit Pawar : अजित पवारांचं मोठं विधान, लाडकी बहीण योजनेवर म्हणाले, महिलांचे उत्पन्न…


Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांच्या उत्पन्नाबाबत अजित पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ज्यावेळी राज्य सरकार चालवता तेव्हा गोरगरिबांचा विचार करायचा असतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा सुद्धा विचार करायचा असतो.

आपण वर्ड बँक असेल किंवा केंद्र सरकार असेल रस्ते विकास महामंडळाकडून कोट्यावधी रुपयांची कामे चालली आहेत. केंद्र सरकार मार्फत राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू आहेत.

गोरगरीब महिलांना ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशांना आपण दीड हजार रुपये महिना देणार आहोत. ज्यांना आई-वडील गरीब असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही त्यांच्याही करिता ५०% सवलत होती ती १००% केली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जातील, असं अजित पवार म्हणाले आहे. Ajit Pawar

ते पुढे म्हणाले, मी पण शेतकरी आहे माझी शेती याच काटेवाडीमध्ये आहे. तिथे लाईटच्या बिलाबाबत तो शेतकऱ्यांची नेहमी तक्रार असते, म्हणून फार विचारपूर्वक साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत वीज मापे करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असंही अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना वीजबील माफी दिली आहे. त्यांना आता वीज बिल भरायचे नाही. दुधाला लिटरला पाच रुपये वाढवून दिले आहेत. दुधाची पावडर निर्यात करायला सवलत दिली आहे.

आताच्या केलेल्या अर्थसंकल्पातील सर्व योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी राज्य सरकार कठीण आहे, असं म्हणत अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!