Ajit Pawar : भाजपच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले, अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा…


Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील पक्षांमधली बंडाळीही समोर येताना दिसते आहे. काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होताना दिसत आहे.

त्यातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अनेकजण तुतारी हाती घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी त्यांच्याकडे विनंती करत आहेत.

भाजपाचे लक्ष्मण ढोबळे हेदेखील कमळ सोडून हाती तुतारी घेणार हे निश्चित झाले आहे. त्यांनी भाजपाला जय महाराष्ट्र करताना अजित पवारांवर टीका केली आहे. Ajit Pawar

भाजपा सोडण्याच्या मनस्थितीत येऊन रामाची साथ लक्ष्मणाने सोडली. लक्ष्मणाच्या कष्टाचे चिज झाले नाही असे वाटले. आता स्वामीनिष्ठेने शरद पवारांबरोबर राहणार आहे, त्यांची सेवा करणार आहे. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार आहे.

दोन दिवसांत माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या मतदारसंघात जो विद्यमान आमदार आहे त्याची अडचण होऊ नये, त्याला मोकळीक मिळावी म्हणून मी तिथून बाजूला होतो आहे. असे लक्ष्मण ढोबळे यांनी म्हंटले आहे.

अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडतो…

अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी बाजूला होतो आहे समाधान अवताडेंना मी मोकळी जागा या ठिकाणी करुन देत आहे. असेही ढोबळेंनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!