Ajit Pawar : बारामतीचे राजकारण वेगळ्या वळणावर!! अजित पवारांची शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर टीका, म्हणाले, काय पुळका आलाय…


Ajit Pawar : निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होतेय ती बारामती विधानसभा मतदारसंघाची…

कारण बारामतीत पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना होतोय. अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. युगेंद्र पवार यांचा प्रचार करण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील मैदानात उतरल्या आहेत.

त्या ठिकठिकाणी जात लोकांना भेटत आहेत. यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. निवडणूक प्रचारासाठी अजित पवार गावभेट दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी त्यांच्या काकी प्रतिभा पवार यांचं नाव घेत विधान केले आहे. Ajit Pawar

शरद पवार यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रतिभा पवार प्रचारात दिसायच्या मात्र नंतर त्या प्रचार करताना दिसल्या नाहीत. मात्र यंदा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत. यावर अजित पवारांनी भाष्य केलंय. काय नातवाचा पुळका आलाय कळेना. काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे.

आता वेळ नाही विचारण्याची. त्यांना विचारणार आहे की प्रचाराचा एवढा का पुळका आला होता?, असंही अजित पवार म्हणाले. प्रतिभा पवार सध्या गावागावात प्रचार करीत आहेत. यावर कार्यकर्ता म्हणाला दादा तुमच्यावर प्रेम आहे. त्यावरही अजित पवारांनी टिपण्णी केली. असलं प्रेम नको रे बाबा, असं अजित पवार कार्यकर्त्याला म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!