Ajit Pawar : घोडगंगा बंद पाडला, तुमचा आणि तुमच्या मेव्हण्याचा कारखाना कसा चालतो, आता बघू तू कसा आमदार होतोय, अजित पवारांनी अशोक पवारांना घेरलं…


Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एका आमदाराला निवडणुकीत पाडण्याचं चॅलेंज दिलं आहे. शिरुर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत अजित पवारांच्या रडारवर आमदार अशोक पवार आले.

अजित पवार म्हणाले, घोडगंगा बंद पडला म्हणून माझ्यावर पावत्या फाडता? तुमचा आणि तुमच्या मेहुण्याचा खाजगी कारखाना कसा जोरात चालतो? तसेच शिरुरचे आमदार अशोक पवार पुन्हा आमदार कसा होतो, तेच पाहतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अशोक पवारांना पाडण्याचे थेट आव्हान अजित पवारांनी दिलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसापासून अमोल कोल्हे आणि अजित पवार एकमेकांवर टीका करत होते मात्र आता कोल्हेंच्या पराभवाची आखणी करणाऱ्या अजित पवारांच्या निशाण्यावर आता शिरुरचे आमदार अशोक पवार आले आहेत. Ajit Pawar

दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे.

त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री होणार आहे. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!