Ajit Pawar : शरद पवारांनी केलेल्या टीकेला अजित पवारांचे एकाच वाक्यात उत्तर, म्हणाले..


Ajit Pawar : अजित पवार आज यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच सहयोग भवन येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध घटकांशी चर्चा करत पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा तसेच त्यांना प्रचारात सक्रिय होण्यासंदर्भातील चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी त्यांना शरद पवारांच्या दुष्काळी दौऱ्यावरून प्रश्न विचारला.

शरद पवार यांनी असे सांगितले होते की, गेली २० वर्षे आपण केंद्रात आहोत. काही लोकांकडे जबाबदारी दिली होती, असे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांची नाव न घेता सांगितले होते. जनाई उपसा सिंचन योजनेची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली नाही असे दिसते.

या पुढील काळात आपण ती पाहून घेऊ आणि ती योग्य कशी चालत नाही, ते मी पाहतो असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर आज अजित पवार यांना विचारले असता, अजित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला.‌ ते म्हणाले, शुभेच्छा!

दरम्यान दुसरीकडे शरद पवारांनी कालच्या सभेतच एक चिठ्ठी वाचून दाखवली. ज्यामध्ये मतदारसंघातील लोकांना पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मत द्या, तसेच ऊस कारखान्याला घालवायचा असेल तर घड्याळाला मत द्या अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे शरद पवारांनी सांगितले. त्या संदर्भात आज अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी जर धमक्या दिल्या जात असतील, तर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद द्यावी. Ajit Pawar

पोलीस त्याची चौकशी करतील असे उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, संस्था संस्थांच्या पद्धतीने चालत असतात. धमक्या देण्याचा प्रश्नच येत नाही, पण जर कोणाला धमक्या दिल्या असतील, तर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करा असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील लोकसभेची निवडणूक ही मोदी विरुद्ध गांधी नसून मोदी विरुद्ध ठाकरे आहे असे संजय राऊत म्हणले होते, त्यावर अजित पवार हसले. अजित पवार म्हणाले की, काहीतरी योग्य सांगा.

तुम्हाला तरी हे पटतं का? ज्यांची बरोबरी करायची, अशी बरोबरीचा तरी माणूस सांगा. राज्याच्या बाहेर ज्यांचा एकही माणूस नाही आणि ते मोदींची बरोबरी करायला चालले आहेत अशा स्वरूपात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!