Ajit Pawar : शहराध्यक्षानंतर कट्टर समर्थक शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत!! अजित पवारांना बालेकिल्ल्यातच अजून एक धक्का…


Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. सुरुवातीपासून अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून अजितदादांना हादरे बसायला सुरुवात झाली आहे.

पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेनंतर आता अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे हे शरद पवार गटात जाणार असल्यच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे लोकसभा निकालानंतर अस्वस्थ असलेल्या अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी चिंचवडची पोटनिवडणूक लढलेले अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे काहीही झालं तरी, मी चिन्हावरचं लढणार, यावर ते ठाम आहेत. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांची भेट घेतली.

त्यावेळी शरद पवारांनी सर्वांसाठी दारे खुली ठेवल्याचं जाहीर केले. आता याच दारातून नाना काटे ही घरवापसी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांनी ऑफर दिल्यास, तुम्ही तुतारी चिन्हावर लढणार का? या प्रश्नावर मी चिन्हावरचं निवडणूक लढणार असं म्हणत त्यांनी संभ्रमावस्था वाढवली. Ajit Pawar

नाना काटे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. जरी महायुतीचे तिकीट भाजपला गेले तरी मी ही निवडणूक लढवणार आहे.मी विधानसभेच्या अनुषंगाने अजितदादांची भेट घेतली होती. विधानसभेत आम्ही तयारीला लागलो आहे.

अजित पवारांनी मला तू तुझ्या पद्धतीने काम सुरू ठेव असे म्हणत संकेत दिले आहेत. जे काही असेल ते पुढे पाहू, असे दादा म्हणाले. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे त्या त्यावेळी निर्णय घेतले जातील. निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे. चिन्ह काय असेल ते त्यावेळची परिस्थिती जशी असेल तसे मी ठरवणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!