Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवार यांचा थेट मनोज जरांगे यांना कडक शब्दात इशारा, म्हणाले, कुणीही…

Ajit Pawar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार तापला आहे. याच पार्श्वभूमीवर काहीही झाले तरी येत्या २० जानेवारी रोजी आम्ही मुंबईत येणारच. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही येणारच आहोत, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर, कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कल्याणमध्ये आले होते. कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना नाव न घेता कडक इशारा दिला आहे.
अजित पवार म्हणाले, कुणीही कायदा हातात घेतला तर त्याला मुलाहिजा ठेवणार नाही अशा कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. Ajit Pawar
त्याचबरोबर अजित पवार यांचा हा इशारा येताच मनोज जरांगे यांनी देखील पलटवार करत जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पवारांच्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिल आहे. माझ्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ अजित पवार यांना सापडलेल्या नोंदी माहिती नाहीत का? राज्यभरात ५४ लाख नोंदी सापडलेल्या असताना संविधानाच्या चौकटीत आरक्षण मिळेल असे असताना ते विरोधात का बोलत आहेत? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.