Ajit Pawar : हा अजित पवारांचा वादा आहे!! लाडकी बहिण योजनेवर अजितदादा यांचे मोठे वक्तव्य…
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार यांनी पारनेरला जात असताना रांजणगावमध्ये संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नागरिक, शेतकरी, महिला तरुण, तरुणी यांच्यासाठी वेगवेगळ्या आणि चांगल्या योजना या सरकारनं आणल्या आहेत.
विकास हेच आमचं ध्येय आहे. गरीब समाजाला वर आणण्यासाठी या योजना आहेत. पुढेही या योजना आणण्यासाठी आपण सहकार्य करावं. लाडक्या बहिण योजनेसाठी महिला रांगा लावतात, पण घाबरू नका प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मी शेतकरी आहे, मला शेतकऱ्यांचं दुःख माहिती आहे. कोणत्याही जाती-पातीचा विचार न करता गरीब महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली आहे. गरीब महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. तुम्ही मला कायम निवडून द्या, मी अनेक योजना आणेल. हा चुनावी जुमला नाही हा अजित पवार यांचा वादा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. Ajit Pawar
दरम्यान, आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांकडून आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.