Ajit Pawar : अजित पवार यांच्यानंतर आता दत्तात्रय भरणेही झाले गुलाबी, तालुक्यात रंगली जोरदार चर्चा…
Ajit Pawar : अजितदादा यांच्या गुलाबी शर्टने राज्यात राजकारणाचे रंग दिसू लागले आहेत. विधानसभा निवडणूक अगदी जवळ आल्याने प्रत्येक राजकीय पक्ष ब्रँड इमेज तयार करण्याच्या मागे लागला आहे. समाजात पक्षाविषयी सकारात्मक संदेश जावा हा त्यामागील उद्देश आहे.
राज्यात लाडकी बहीण योजनेनंतर गुलाबी जॅकेट राज्यात भाव खाऊन जात आहे. याचदरम्यान, उद्या इंदापूर मध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने शहरात लावलेल्या बॅनरवर आमदार भरणे यांचा गुलाबी शर्ट घातलेला फोटो पण यानिमित्ताने चर्चेत आला आहे. Ajit Pawar
दत्तात्रय भरणे यांच्या गुलाबी शर्टची इंदापुरात जोरदार चर्चा…
अजित पवारांच्या गुलाबी जॅकेट सोबत आता आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गुलाबी शर्ट ची इंदापूर मध्ये चर्चा रंगली आहे. उद्या इंदापूरमध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने शहरात लावलेल्या बॅनरवर आमदार भरणे यांचा गुलाबी शर्ट घातलेला फोटो आहे.
गुलाबी रंगाच्या कॅम्पेन मध्ये आता दादांसोबत आमदार दत्तात्रय भरणे देखील सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेट नंतर आता आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गुलाबी शर्ट ची थीम दिसून येत आहे. शहरात लावण्यात आलेल्या अनेक बॅनरवर भरणे यांच्या गुलाबी रंगाचा शर्ट दिसत आहे.