Ajit Pawar : अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिल्यानंतर भल्यापहाटे अजितदादांनी केली शिरूर मतदारसंघाची पाहणी, म्हणाले, ‘मी जे सांगितलं ते फायनल..

Ajit Pawar शिरूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुणे दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले आणि अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचे रान केले, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असे ते म्हणाले.
काल अजित पवारांनी ते वक्तव्य केले त्यानंतर आज सकाळीच ते अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांनी शिरूर मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा देखील घेतला आहे.
यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही आमचा निर्णय घेणार, शिरूरबाबत मी जे बोललो तेच फायनल असे. ठाम मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केल आहे. Ajit Pawar
त्याचबरोबर मी जे काही चॅलेंज काल अमोल कोल्हे यांना दिले होते. त्याचा आणि आज झालेल्या दौऱ्याचा काही संबंध नसल्याचे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. माझा हा दौरा नियोजित होता असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हेंचा पराभव करणारच असं अजित पवारांनी म्हटलं आणि आज त्यांनी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा केला. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.