Ajit Pawar : ब्रेकिंग! अजितदादांसह राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ही भेट झाली असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांसह खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे हे देखील यावेळी उपस्थित होते.
शरद पवारांसोबत फारकत घेऊन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. अजित पवारांच्या पाठिशी बहुसंख्य आमदार गेले. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्वाळा दिला होता. तर, शरद पवारांनी पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात झाली. Ajit Pawar

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांवर टीका झाली होती. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर मात केली. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांवर टीका केली होती.
विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार, शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, पार्थ पवार आदीदेखील शरद पवारांची भेट घेतली.