Ajit Pawar : शरद पवारांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला अजितदादांचे शेलक्या शब्दात उत्तर म्हणाले, काही लोक…

Ajit Pawar : शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, नरेंद्र मोदी जर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले तर ते देशाचं संविधान बदलतील. विरोधी पक्षातील इतर नेतेही अशीच टीका करताना दिसतात. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात उत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले, लोकशाहीत कुणी कुणाचे काम करायचे. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण देश आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. मात्र काही लोके गैरसमज पसरवत आहेत.
जर २०२४ मध्ये मोदी सरकार आले तर ते देशाची राज्यघटना बदलतील असं म्हटलं जातंय. पण तसं काहीही होणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर आहे.

लोकांनी अनेकदा आम्हाला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. एकंदरीत राजकीय कल बघता मुरलीधर मोहोळ चांगल्या मतांनी निवडून येण्यास काही अडचण येणार नाही. Ajit Pawar
ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रीडा क्षेत्रासाठी मी काम केले आहे, कुठलीही अडचण येऊ दिली नाही. महायुतीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. महाराष्ट्रचा सर्वांगिक विकास कसा होईल हे बघतोय, असेही अजित पवार म्हणाले आहे.