Ajit Gopchade : भाजपकडून राज्यसभेची संधी मिळवणारे अजित गोपछडे नेमके कोण आहेत?, जाणून घ्या..

Ajit Gopchade : भाजपाने राज्यसभा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. अजित गोपछडे यांचे नाव या यादीत समोर आल्यानंतर अनेकांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. गोपछडे नेमके कोण आहेत? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
अजित गोपछडे हे भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व डॉ. ते भाजपशी संबंधित असून त्यांनी पक्षात महत्त्वाची पदे भूषवली आहेत. डॉ. अजित गोपचडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदू राष्ट्रवादी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत.
आगामी राज्यसभा निवडणुकीत त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. गोपछडे हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कोल्हे बोरगाव गावचे रहिवासी आहेत. गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले आहे.
त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई (जि. बिड) येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाले. Ajit Gopchade
महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले.
पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.