अजितदादांना पाठिंबा आणि दादांचे आमदारांना गिफ्ट!! पुण्यातील आमदारांना मोठा दिलासा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह नऊ जण शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले.
तसेच यावेळी त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. या आमदारांनी विकासासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत आल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानुसार अजित पवार यांनी त्यांना गिफ्ट दिले आहे. पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना गिफ्ट मिळाले आहे.
काय मिळाले आमदारांना
विकासासाठी अजित पवार यांची साथ दिल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. आता अजित पवार यांनी आंबेगाव तालुक्याला आदिवासी भागाच्या विकासासाठी भरुभरुन निधी त्यांना दिला आहे.
दिलीप वळसे यांच्या मतदार संघात २९ कोटी ८० लाखांचा निधी आदिवासी भागाच्या विकासासाठी, तर बिगर आदिवासी भागाच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी दिला आहे.
तर, खेड तालुक्याला पश्चिम पट्ट्याच्या विकासासाठी दिलीप मोहिते यांना २५ कोटींचा निधी दिला. पावसाळी अधिवेशनात ८० कोटींचा निधी अजित पवार यांनी दिला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी मंजूर झाला आहे.