मंगळवार ठरला अपघात वार! सिंदखेडराजामध्ये भीषण बस अपघातात ९ ठार, १२ प्रवासी गंभीर जखमी…


सिंदखेडराजा : येथील पळसखेडमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. यामुळे अक्षरशः मृत्यूचे तांडव बघायला मिळाले आहे. येथे पुण्याहून मेहकरकडे येणार्‍या एसटी महामंडळाच्या बसला मेहकरवरून सिंदखेडराजाच्या दिशेने जाणार्‍या भरधाव कंटेनरने समोरासमोर जोरदार धडक दिली.

यामध्ये बसमधील 5 प्रवासी जागीच ठार झाले, तर 4 प्रवाशांनी उपचारादरम्यान दम तोडला. दोन्ही वाहने भरधाव वेगात एकमेकांना समोरून धडकल्याने हा भीषण अपघात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा ते मेहकर रोडवरील पळसखेड चक्का गावाजवळ घडला.

हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना ओळखणे देखील अवघड झाले होते.
या दुर्देवी अपघातात आतापर्यंत ९ जण ठार झाले असून, आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच, १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

       

जखमींवर सिंदखेडराजा येथे उपचार सुरू होते. काहींना तातडीने जालना व छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. या अपघातात कंटेनरमध्ये फसलेल्या चालकाला कटरच्या सहाय्याने पत्रा कापून बाहेर काढावे लागले.

या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी मदतकार्य सुरू केले. हा अपघात नेमका कसा झाला हे अजून समोर आले नाही.

तसेच अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ देखील भीषण बस अपघात झाला आहे. यामध्ये संपूर्ण कुटूंबच अपघातात मृत्युमुखी पडले असून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले आहेत.

रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. एकाच कुटुंबातील १२ जण लग्नासाठी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते. लग्न आटोपून ते दर्यापूरकडे परत येत असताना पाठीमागून आलेल्या एका मोठ्या वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!