Ahmednagar : बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी जवान गेले, अचानक बोट बुडाली अन् घटनेत तीन जवानांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु…


Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते.

सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे. Ahmednagar

सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना घडली होती. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असतताना अहमदनगर जिल्ह्यात तीन जवान आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध एसडीआरएफ जवानांनी सुरु केला होता. परंतु धरणातून पाणी सोडलेले असल्यामुळे नदीच्या प्रवाहात पाण्याचा वेग प्रचंड होतो. यामुळे जवानांची बोट उडाली. यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्याचे मृतदेह मिळाले आहेत.

तसेच दोघांचा शोध सुरु आहे. या बोटीत एसडीआरएफचे ४ जवान आणि १ स्थानिक नागरिक होता. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळच ही घटना घडली आहे. जे जवान वाचवण्यासाठी आले, त्यांचाच मृत्यू झाल्याची घटना घडली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!