Ahmednagar News : जागेचा वाद अन् अडीच वर्षाच्या मुलासह आईची हत्या, पारनेरच्या घटनेने महाराष्ट्र हादरला..


Ahmednagar News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

घराच्या जागेवरून झालेल्या वादामध्ये माय-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अहमदनगरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. Ahmednagar News

मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या जागेवरून पारनेर परिसरात राहणाऱ्या श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबियांमध्ये वाद सुरु होते. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये नेहमीच खटके उडत असत. मात्र गुरुवारी या वादाने टोक गाठलं आणि दोन जणांचा जीव यामध्ये गेला आहे.

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आरोपीने अडीच वर्षाच्या चिमूरड्यावर गाडी घातली यामध्ये चिमुरड्याचा आणि त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर महिलेच्या सासूने तक्रार दाखल केली असता याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!