Ahmednagar Crime : तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे, बीडच्या माजी आमदाराला धमकी, दोन जणांना अटक, घटनेने सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?


Ahmednagar Crime : बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिलांसह एक स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक कोटी रुपयांची खंडणी करण्यात आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

माजी आमदाराने त्यामधील २५ हजार रुपये दिल्याचे पोलीस तक्रारीतून समोर आले आहे. याप्रकरणाचा अहमदनगर पोलीस कसून तपास करत आहेत. आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन एका माजी आमदाराला ब्लॅकमेल करण्यात आले. त्या माजी आमदाराकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिलांसह एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने खंडणी मागितल्याबाबत अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान खंडणीच्या रकमेपैकी २५ हजार रुपये अहमदनगरमधील एका यू ट्यूब चॅनेलच्या पत्रकाराने स्वीकारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Ahmednagar Crime

संबंधित महिलांशी तडजोड करून देण्याची ऑफर देत बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला खंडणी मागण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पैसे दिले नाही तर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान अहमदनगरमध्ये युट्युब चॅनेलचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून अनधिकृत न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!