Ahmednagar Crime : घरावर दरोड्याचा बनाव, संधी मिळताच पत्नीचे पतीसोबत खळबळ उडवून देणारे कांड, घटनेने अहमदनगर हादरले


Ahmednagar Crime अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये दरोडा पडला होता. या प्रकरणात एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करून सात लाखांचा ऐवज पळवला होता. संपूर्ण जिल्ह्याला हादरवुन सोडणाऱ्या या घटनेत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Ahmednagar Crime)

मिळालेल्या माहिती नुसार, श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावात दरोडेखोरांनी नईम पठाण याची हत्या करून सात लाखांची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना घडली होती. ही घटना बुधवारी (ता.२०) रोजी घडली होती. या घटनेने संपूर्ण नगर जिल्हा हादरून(Ahmednagar Crime) गेला होता. परंतु या धक्कादायक दरोड्याप्रकरणात आता नवीन आणि खळबळजनक खुलासा झाला आहे.

दरोड्याचा बनाव करत पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नईम पठाण याची पत्नी बुशरा पठाणनेच पतीला मारल्यानंतर दरोड्याचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात झोपेच्या गोळ्या खावू घातल्यानंतर साडीने गळा आवळून पत्नीनेच हे भयंकर कांड केल्याचा उलघडा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी नईमची पत्नी बुशरासहआणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनीच मिळून दरोडेखोरांनी मारहाण करत घरातील ऐवज चोरून नेल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!