Ahmednagar Crime News : नगर हादरलं! जावयाने केली धारधार शस्त्राने पत्नी, मेहुणा, आजे सासूची हत्या, घटनेने उडाली खळबळ..

Ahmednagar Crime News : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ एका गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुल्लक कारणावरून जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, मेहुणा आणि आजे सासूचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. (Ahmednagar Crime News)
या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्य झाला असून सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले आहे. (Ahmednagar Crime News)
पत्नी वर्षा सुरेश निकम (वय. २४ वर्षे), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (वय . २५) आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय. 70 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.
तर, सुरेश निकम असे आरोपी जावयाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसारराहता तालुक्यातील सावळीविहिर वाडी (Ahmednagar Crime News) येथे पत्नी माहेरी राहत होती. यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती आहे. याच कारणावरून सुरेश निकम यांचा पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत अनेक वर्षांपासून सतत वाद सुरु होते. या वादातूनच हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान, काल मध्यरात्रीच्या सुमारास जावई पत्नीच्या घरी गेला, आणि सासरच्या लोकांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत पत्नी, मेहुणा आणि सासूचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या हल्ल्यात सासरा आणि मेहुणी मध्यस्थी करत असताना दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके आणि पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.