Ahmednagar : खासदार निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकासह २४ जणांवर ॲट्रॉसिटी, तर माजी आमदार विजय औटीसह १४ जणांवर पारनेर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल, नगरमध्ये खळबळ..


Ahmednagar : देश आणि राज्याप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातही भाजपच्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी मोठी आघाडी घेत भाजपच्या डॉ. सुजय विखे यांचा पराभव केला आहे.

त्यानंतर नगर मधील निवडणुकीनंतर खासदार निलेश लंके व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर संपता संपत नाही. लंकेच्या पीए वर हल्ला झाला आणि त्यानंतर दोन्ही गटाविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी झाल्या यामध्ये ॲट्रॉसिटी हल्ला अशा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तब्बल ३८ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खासदार लंके यांचे स्वीय सहायक राहुल झावरे यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , प्रितेश पानमंद, अंकुश भागाजी ठुबे, संगम सोनवणे, नामदेव औटी, मंगेश कावरे, पवन बाबा औटी, प्रमोद जगन्नाथ रोहकले, प्रथमेश दत्तात्रय रोहकले, सुरेश अशोक औटी, निलेश उर्फ धनु दिनकर घुमटकर यांच्यासह इतर तीन ते चार अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल झावरे यांच्या वनकुटे या गावातील ग्रामस्थांनी विजय आवटी यांना गावातून हाकलून दिले होते तो अपमान झाल्याच्या रागातून हा हल्ला झाला अशी फिर्याद एडवोकेट राहुल झावरे यांनी दिली होती. Ahmednagar

झावरे व त्यांचे सहकारी राजेंद्र तराळ हे कारमधून पारनेर मध्ये येत असताना वरील आरोपींनी त्या दोघांची गाडी अडवली व त्यांना खाली उतरवले कोयत्याने कारची काच फोडली व झावरे यांचा गळा दाबून त्यांना जीबी मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या डोक्यात वीट मारली व गजाने मारहाण केली अशी फिर्याद झावरे यांनी दिले आहे.

दरम्यान, दुसरीकडे झावरे यांच्या विरोधात देखील गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून राहुल झावरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर पारनेर तालुक्यातील एका महिलेने विनयभंग ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी जून६ रोजी झावरे व त्यांचे १५ ते १६ समर्थकांनी संबंधित महिला घरासमोर उभा असताना तीन ते चार चार चाकी वाहने घेऊन या महिलेला तिचा पती कुठे आहे अशी विचारणा केली.

त्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत या महिलेला व तिच्या घरच्यांना मारहाण केली. दीपक लंके, संदीप चौधरी, राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधावते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, कारभारी पोटघन, दादा शिंदे, बापू शिर्के, जितेश सरडे, रामा तराळ, नंदू दळवी, किरण ठुबे किशोर ठुबे, सचिन ठुबे, बाजीराव कारखिले, दत्ता ठाणगे, लखन ठाणगे, अक्षय शेंडे, बंटी दाते, संदेश बबन झावरे आदींच्या विरोधात या प्रकरणावरून ॲट्रॉसिटी व विनयभंगाची तक्रार संबंधित महिलेने दिली. या महिलेच्या तक्रारीवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग पारनेरचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी कारवाईची मागणी केली यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!