अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळी सापडलं मोठ्या प्रमाणावर सोनं, 70 तोळे सोन्याचे दागिने, हजारोंची रोकड आणि..

अहमदाबाद : नुकतीच अहमदाबादमध्ये लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरात कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बीजे मेडिकल कॉलेजवर विमान कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा निघाल्या, धुराचे लोट उठले. यामध्ये १५० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी राजू पटेल क्षणाचाही विचार न करता घटनास्थळी धावले. आपल्या कर्मचाऱ्यांसह पटेल अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचले. यावेळी ढिगाऱ्याखालून जवळपास 70 तोळे सोन्याचे दागिने, 80 हजारांची रोख, काही पासपोर्ट आणि भगवद्गीता त्यांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.
या मौल्यवान वस्तू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, सर्व वाचलेल्या वैयक्तिक वस्तूंचे दस्तऐवजीकरण केले जात आहे आणि ते जवळच्या नातेवाईकांना परत केले जाईल. राजू पटेल म्हणाले, सुरुवातीच्या 15 ते 20 मिनिटांपर्यंत, आम्हाला जवळ जाताच आले नाही. आग खूप भीषण होती.
पहिली अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका येताच आम्ही मदतीसाठी उडी मारली. स्ट्रेचर दिसत नसल्याने त्यांनी जखमींना नेण्यासाठी साड्या आणि चादरी वापरल्या. असा घटनाक्रम त्यांनी सांगितला. अधिकाऱ्यांनी पटेल यांच्या टीमला रात्री नऊ वाजेपर्यंत घटनास्थळी राहण्याची परवानगी दिली. आपत्कालीन सेवांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवताच, पटेल यांच्या टीमने पुढील काम सुरु केले.
तसेच पटेल म्हणाले, या कठीण काळात आम्ही काहीतरी करू शकलो याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्यांनी 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटांवेळीही मदत केली होती. बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी सिव्हिल हॉस्पिटलपासून फक्त 100 मीटर अंतरावर होतो. पण यावेळच्या अपघातातील विनाश आग मी हे कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले.