अहिल्यानगर हादरलं; पत्नी माहेरला गेल्याचा डोक्यात राग अन् बापानं 4 मुलांसह उचललं टोकाचं पाऊल…

अहिल्यानगर : राहाता तालुक्यातील कोन्हाळे शिवारात एका पित्याने आपल्या चार लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादातून आणि तिच्या माहेरी गेलेल्याच्या रागातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरुण काळे ( (वय ३५, रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा) हा श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव व्यवसाय रहिवासी आहे त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. घरातील वादामुळे त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. तिला परत येण्यासाठी पतीने कॉल केला असता तिने नंबर ब्लॉक केला.पत्नी परत येत नसल्याने अरुण नैराश्यात होता. तसेच अरुणने आपल्या पत्नीला फोनवरून मुलांना संपवण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुलांना शाळेतून घेऊन आल्यावर
कोन्हाळे बायपासजवळील भाऊसाहेब कोळगे यांच्या शेतातील विहिरीवर पोहोचून त्याने मुलांना एकामागून एक विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही दारूचे सेवन करून, हातपाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली.. या मृतांमध्ये मुले शिवानी (८), प्रेम (७), वीर (६) आणि कबीर (५) यांचा समावेश आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत सर्व पाच मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.