अहिल्यानगर- पुणे रेल्वे मार्ग विकसित होणार! महत्वाची 8 स्थानके विकसित केली जाणार, जाणून घ्या..


पुणे : सध्या अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदा ची बातमी समोर आली आहे. आता अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असून पुणे जिल्ह्याला एकूण दोन रेल्वे मार्गांची भेट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव – चाकण – उरळी असे दोन रेल्वे मार्ग विकसित होणार असल्याची माहिती दिली आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सखोल चर्चा केली आहे. तसेच या दोन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी या अनुषंगाने हे दोन रेल्वे मार्ग विकसित करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून या दोन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे.

यामुळे लवकरच याबाबत कामे सुरु होतील, असा अंदाज आहे. या रेल्वे मार्गावर एकूण आठ स्थानके विकसित केली जाणार आहेत. हा मार्ग वढु बुद्रुक, शिक्रापूर मार्गे अहिल्यानगर पर्यंत जाणार आहे. पुण्यावरून कोरेगाव भीमा – शिक्रापूर – रांजणगाव – पिंपळनेर – अहिल्यानगर असा हा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे.

यामुळे रांजणगाव, सुपा, अहिल्यानगर या औद्योगिक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी आशा आहे. या प्रकल्पाचे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पानुसार तळेगाव – चाकण – वाघोली – उरुळी असा नवीन मार्ग तयार केला जाईल. या प्रकल्पाचे काम चार वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती समोर येत आहे.

तसेच या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 75 किलोमीटर असेल. हा पूर्णपणे नवीन रेल्वे मार्ग राहणार आहे. हा रेल्वे मार्ग उरळी वरून सोलापूर – पुणे रोडवर जोडला जाईल. यामुळे हा मार्ग अनेक अंगाने फायदेशीर असणार आहे. तसेच अजित पवार यांनी उरळी येथे अडीचशे एकर जमिनीवर मेगा टर्मिनल विकसित होणार असल्याची माहिती दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!