Agriculture News : मानलं भावा! चक्क ऑडी कारमधून भाजी विक्री करतोय शेतकरी, फोटो झाले व्हायरल…
Agriculture News : शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी असतात तर कधी सुलतानी सकटांचा सामना करावला लागतो. या स्थितीत देखील काही शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. Agriculture News
तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीत मोठी क्रांती घडवून आणत आहेत. त्यामुळेच अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण देखील शेती क्षेत्राकडे वळत आहेत. शेतकरी लक्झरी कारमध्ये बसून बाजारात आपले उत्पादन विकायला जात आहे.
तूम्हाला हे खरे वाटत नसेल तर केरळच्या एक शेतकऱ्याची कहानी तुम्ही वाचायला हवीच. केरळचा हा शेतकरी साध्यासुध्या नव्हे तर चक्क ऑडी ए 4 मध्ये बसून बाजारात भाजी विकायला जात आहे. शेतीचा व्यवसाय तसा बिनभरोशाचा म्हटला जातो.
शेती करणे हा तसा आतबट्ट्याचा व्यवहार मानला जातो. केरळच्या या ऑडीवाल्या शेतकऱ्याचे नाव सुजीत आहे. तो देखील आधुनिक शेतकऱ्यांच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. त्याने शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे.
आज तो यशस्वी शेतकरी बनला असून अनेक शेतकऱ्यांचा आदर्श बनला आहे. लोक त्याला रस्त्याच्याकडेला ऑडी कार उभी करून भाजी विकताना पहातात तर आश्चर्यचकीत होऊन जातात. Agriculture News
मागील १० वर्षांपासून सुजित शेती करत असून शेतीतील अभिनव प्रयोगासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित केले गेले आहे. सुजित यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते भाजी विकण्यासाठी चक्क ऑडी कार घेऊन जातो.
सुजीतने सोशल मीडियावर आपल्या ऑडीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने काही फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल केले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो शेतकरी त्याची ऑडी बाजारात घेऊन जाताना दिसत आहे.