कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले, म्हणाले, सरकार भिकारी, शेतकरी नाही….

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले आहेत. यातच त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे नव्या राजकीय खळबळीला सुरुवात झाली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले, हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला. म्हणजे भिकारी कोण? सरकारच ना?” या विधानामुळे अनेकांना धक्का बसला असून विरोधकांनी सरकारच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
या विधानानंतर कोकाटेंनी आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांनी कृषी खात्यात अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. माझ्या काळात बोगस अर्ज सापडले, ते मी तात्काळ रद्द केले. मी ५२ शासन निर्णय काढले, अनेक संशोधन केंद्रांना भेट दिली, आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या, असे ते म्हणाले. तसंच त्यांनी हवामान केंद्रांची मागणी प्रत्येक गावात केली असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे.

विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बोलताना कोकाटे यांनी, ‘राजीनामा देण्यासारखं घडलं काय. मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय.
ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात’ असं विधान केलं आहे.
रमी खेळाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुरू झालेल्या राजीनाम्याच्या मागणीबाबत कोकाटे म्हणाले, राजीनामा देण्यासारखं काय घडलंय? मी काही चोरी केली नाही, गुन्हा केला नाही. ज्याने व्हिडीओ काढला, त्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असे सांगत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.