वय उलटून गेलं पण लग्न जमलं नाही, सख्ख्या भावांनी नैराश्यातून केली आत्महत्या, घटनेने सगळेच हादरले…


कर्नाटकातील संकेश्वर जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी वय उलटून गेल्याने लग्न न झाल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या भावांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिस्थिती किती भीषण आहे, हे समजून येत आहे.

हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात समोर आली आहे. मृत्यू झालेल्या भावांची नावं संतोष रवींद्र गुंडे आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे अशी आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या दोघांनी विष प्राशन करून आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याने नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, विवाह ठरत नाही, वय उलटून गेलं, या नैराश्यातून दोन सख्ख्या अविवाहित भावांनी विष प्राशन करून आयुष्य संपवलं. हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात समोर आली आहे. स्थानिकांनी या भावांच्या मानसिक अवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली आहे.

वय वाढत गेलं तरी विवाह जुळत नसल्याने दोघे टेन्शनमध्ये होते. दोघेही मानसिक तणावात होते. आत्महत्येविषयी कळताच त्यांच्या नातेवाइकांना याची माहिती मिळताच दोघांनाही तातडीने वाहनातून गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले.

दरम्यान, या आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे. सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय गंभीर झाला आहे. मुलांचे वय निघून जात असून तरी देखील लग्न होत नाहीत. शेतकऱ्यांची तर परिस्थिती खूपच भयानक आहे. यामुळे तरुण मुलं चिंतेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!