मोदींविरोधात 19 पक्ष एकवटले, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार, कारण…
नवी दिल्ली : दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. याचे काम सध्या पूर्ण झाले आहे. येत्या 28 मे रोजी होत आहे.
असे असताना संसद भवनाच्या इमारती उद्घाटनावरुन मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी बहिष्कार टाकला. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करु नये अशी भूमिका घेतली आहे.
त्यांनी पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करावं असं म्हटलं आहे. यावरुनच काँग्रेसनं या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे. आता राष्ट्रवादी तसेच ठाकरे गटानेही महत्वाचा निर्णय घेतला आहे.
या सोहळ्यावर आत्तापर्यंत १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, ठाकरे गट, राष्ट्रीय जनता दल, सीपीएम आणि सीपीआय यांसह इतरही अनेक पक्षांचा समावेश आहे.