एमपीएससी पास दर्शना पवार हिच्या हत्येनंतर आता प्रशासनाचा मोठा निर्णय, आता किल्ल्यावर..
पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिच्या हत्येनंतर आता प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दर्शनाची हत्या राजगड किल्ल्यावर झाली होती. ते ओळखून प्रशासनाने सिंहगडावर रात्रीच्या वेळी प्रवेश बंद केला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे.
त्यासाठी सिंहगडाजवळ असलेल्या कोंढणपूर येथे तपासणी नाका उभारला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रेमी युगलांना आता चाप बसणार आहे. तसेच गड अन् किल्ल्यांचे पावित्र्यही राखले जाणार आहे.
पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली होती. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही माहिती मिळाली होती.
फडणवीसांनी थोपठली पाठ! कोयता हल्ल्यात तरूणीला वाचविणाऱ्या युवकांचे फोन करून कौतुक
तिचा मित्र असलेला राहुल हंडोरे यानेच ही हत्या केली होती. त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून हत्या का केली? कशी केली? आदी माहिती जमवून भक्कम पुरावा पोलीस तयार करत आहेत. गुरुवारी त्याची पोलीस कोठडी संपली होती.
एमपीएससी पास दर्शना पवार हिच्या हत्येनंतर आता प्रशासनाचा मोठा निर्णय, आता किल्ल्यावर..
परंतु पोलिसांनी न्यायालयाकडून पुन्हा पोलीस कोठडी मागून घेतली. न्यायालयानेही पोलिसांची मागणी मान्य करत त्याच्या कोठडीत वाढ केली आहे.
आता 3 जुलैपर्यंत राहुल हंडोरे याचा मुक्कम पोलीस कोठडीत असणार आहे. त्याचवेळी प्रशासनाने असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे.