घायवळनंतर आता टिपू पठाण पोलिसांच्या टार्गेटवर ; पुणे पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल..


पुणे: विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कुख्यात गुंड घायवळनंतर आणखी एक टोळी चर्चेत आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड टिपू पठाण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. आता एका जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे पोलिसांनी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, टिपू पठाण याने बेकायदेशीरपणे जागेवर ताबा मारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.आरोपी पठाणने संबंधित जागेवर ताबा मारून जागा मालकाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. जागेवरील ताबा सोडण्यासाठी त्याने जागा मालकाकडे 25 लाख रुपये मागितले होते.या प्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिझवान उर्फ टिपू पठाण याच्यासह एकूण 13 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

विशेष म्हणजे आयुष कोमकर हत्या प्रकरणात देखील टिपू पठाण टोळीचं नाव समोर आलं होतं. या टोळीनेच आंदेकर टोळीला शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आता पठाणविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!