अजित पवारांशी वादानंतर IPS अंजना कृष्णाच्या मागे चौकशीचा ससेमिरा ; राष्ट्रवादी नेत्याचे थेट UPSC ला पत्र….

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या वादानंतर आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता अंजना कृष्णा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.अजित पवार राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी थेट यूपीसीला पत्र लिहिले आहे.

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वातावरण चांगलच तापलं आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्राची चौकशी करण्याची मागणी यूपीएससीला केली आहे.ही मागणी अर्थातच दादांसोबतच्या विवादीत व्हायरल व्हिडिओनंतर करण्यात आली आहे. मिटकरी यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी युपीएससीच्या सचिवांना याविषयीचे पत्र लिहिले आहे.
अंजना कृष्णा यांनी सेवेत सादर होताना जी शैक्षणिक, जात आणि इतर दस्तावेज, प्रमाणपत्र सादर केली. त्याची चौकशी करण्याची मागणी या पत्राद्वारे मिटकरी यांनी केली आहे. या कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची पडताळा करण्याची मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे. या मागणीवर आता युपीएससी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
