अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच मोठ पाऊल; ‘या ‘तारखेला अंतिम मतदार यादी..


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी आता निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या मतदारसंघासाठी 10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदविलेले मतदार पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. या मतदारसंघासाठी 10 मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादी अद्ययावत अचूक आणि पारदर्शक राहावी या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याच आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री शपथ घेतली होती. आयोगाने मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

दरम्यान त्यानुसार पोटनिवडणुकीसाठी एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, 9 फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या अंतिम यादीच्या आधारे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!