ऐष आरामानंतर नियतीचा प्रकोप! वजन घटलं, प्रकृती ही खंगली… भोंदू खरातच कोठडीत हाल बेकार


पुणे : लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरातबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकेकाळी ऐष आराम जीवन जगणाऱ्या खरातच कोठडीत बेकार हाल झाल आहे. विविध आजाराने आणि पोलिसांच्या चौकशीमुळे तो प्रचंड तणावात असून खरातच वजन घटलं आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचं शरीर विविध व्याधींमुळे आतून पोखरलं आहे. त्याला विविध प्रकारचे पाच आजार झाले आहेत. या आजारांमुळे पोलीस कोठडीत असलेला कॅप्टन खरात हवालदिल झाला आहे. तो एकीकडे गोळ्या औषधं घेत आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांकडून होणारी सततची चौकशी यामुळे तो प्रचंड तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या तणावात त्याला औषधही साथ देईनात. त्याची प्रकृती साथ देत नसल्याचा समोर आल आहे.

18 मार्चला खरातला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.त्यावेळी त्याचं वजन 79 किलो इतकं होत. मात्र आता सात किलोनं त्याच वजन कमी झाल्याची माहिती आहे. म्हणजेच अशोक खरात पोलीस कोठडीत असल्यापासून दरदिवशी त्याचं वजन 400 ते 450 ग्रॅमने कमी झालं आहे. आजारामुळे औषधाचा मारा आणि चौकशीचा ससेमीरा यामुळे खरात दुहेरी कात्रीत सापडला आहे.

दरम्यान अशोक खरातला पॅरालिसीसमुळे एक हात वर करता येत नाही. तो रोज मेंदू विकार तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. यामुळे आता खरातची चांगलीच कोंडी झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!