दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ! पुणे-मुंबईतही हायअलर्ट जारी…


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कारने लगेच पेट घेतला तसेच शेजारील दोन ते तीन इतर वाहनांनाही आग लागली.

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर लगेचच कार पेटली आणि शेजारील दोन-तीन वाहनांनाही आग लागली. स्फोट एवढा जबरदस्त होता की आसपासच्या भागात 200 ते 300 मीटरपर्यंत आवाज घुमला.

या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गाड्यांचे फक्त सांगाडे उरले आहेत. दिल्ली पोलिसांनी तातडीने परिसर सील करून तपास सुरू केला आहे. अग्निशामक दल आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाचे नेमके कारण शोधले जात आहे.

       

या घटनेनंतर देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईतही सुरक्षा वाढवण्यात आली असून महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडूनही राज्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

मेट्रो, रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि गर्दीच्या भागात सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासन नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 6.45 वाजता स्फोट झाला. अग्निशामक दलाने तत्काळ आग विझवली. सध्या दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच आणि एनआयएची संयुक्त टीम तपास करत आहे. स्फोटामागे घातपाताचा उद्देश असण्याची शक्यता तपासात आहे.

दरम्यान, लाल किल्ला परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. संबंधित कार मालकाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!