भांडूप अपघातानंतर बेस्ट प्रशासनाचा चालकांसंदर्भात मोठा निर्णय; अपघाताच खरं कारणहीं समोर…


मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना भांडुप रेल्वे स्थानकाजवळ कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना भरधाव बेस्ट बसने 10 ते 12 जणांना चिरडल्याची घटना समोर आली होती.तसेच बसखाली सापडून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या अपघाताचे कारण समोर आले आहे.अपघातातील बस इलेक्ट्रिक बस होती आणि त्यातील तांत्रिक बाबीच्या गोंधळामुळे चालकाकडून हा अपघात झाल्याचे समोर आले.

भांडुप अपघातात जी इलेक्ट्रिक बस होती. यात चालकाला अटक करण्यात आली. आधीच्या चालकाने ई-बस न्यूट्रलऐवजी ड्राइव्ह मोडवर ठेवली होती. बस न्यूट्रल मोडवर असल्याचे समजून ॲक्सलरेटर दाबल्याचे तपासात समोर आले. हा तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

भांडुप अपघातानंतर आता बेस्ट प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून बेस्टने सर्व चालकांना इलेक्ट्रिक बसचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश गुरुवारी बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिले आहेत. यात ई बस सुरक्षित हाताळणीसह अन्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बेस्ट प्रशासनाने आता चालकांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.या प्रशिक्षणामध्ये संरक्षणात्मक वाहनचालन, ई-बसचे सुरक्षित हाताळणी, वेग नियंत्रण, ब्रेकिंग यंत्रणा तसेच एकूणच रस्ता सुरक्षा पद्धतीवर प्रशिक्षणात भर देण्यात येणार आहे. सर्व चालकांचे शंभर टक्के प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापकांची राहणार आहे.

       

दरम्यान भांडुप अपघातानंतर बसचालकांच्या सेवा नोंदींचा सखोल आढावा घेण्यात येत आहे. पूर्वीची चूक, वारंवार उल्लंघने किंवा निलंबनाचा इतिहास असलेल्या चालकांना तात्काळ वाहनचालन कर्तव्यापासून दूर ठेवण्यात येईल आणि पुढील तपासणी व मंजुरी होईपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात येणार नसल्याचेही बेस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चालकांना मोबाइल चालक वाहन प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!