रोहित पवारानंतर जय पवारही मैदानात?VSR कंपनीबाबत उद्या पत्रकार परिषद,काय भूमिका मांडणार?


पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असल्याचा वारंवार दावा आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. यानंतर आता अजितदादांचे सुपुत्र जय पवार ही सोमवारी पत्रकार परिषदेतून भूमिका मांडणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्हीएसआस कंपनीचा मालक रोहित सिंगचा वैमानिकाच्या आसनावर झोपलेला फोटो ट्विट केला होता. त्यानंतरअजितदादांचा विमान अपघात की घातपात याबाबत काहूर उठवलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच आता सुपुत्र जय पवार यांची सोमवारी सकाळी VSR कंपनीबाबत पत्रकार परिषद होणार आहे.व्हीएसआर कंपनीबाबत जय पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

अजित दादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर देखील प्राथमिक अहवालावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील त्यावर सगळे अहवाल आल्यानंतर आपण याच्यावर सविस्तर बोलू अशी प्रतिक्रिया देखील दिली होती. अहवालावर जय पवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबीयालाच नव्हे तर अख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. त्यांचे पुत्र जय पवार यांनी VSR कंपनीच्या मालकाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.“माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, असे त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सध्या ते दिल्ली दौर्‍यावर आहेत. काल त्यांनी आपचे अरविंद केजरीवाल, आपचे खासदार यांची भेट घेतली. तर इतरही विरोधी पक्षांच्या भेट ते घेणार आहेत. आता जय पवारही याच विषयावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!