चिंता वाढवणारी बातमी! पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, ३६ वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास..

पुणे : पुण्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येत असलेल्या गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढतच आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या हा एक दुर्मीळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही.

अशातच आता पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला आहे. हा ३६ वर्षीय तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी होता. २१ जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला.
गेले आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, मात्र काल त्याने अखेरचा श्वास घेतला. पिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापर्यंत जीबीएसचे १३ रुग्ण आढळलेत, त्यातील हा पहिला बळी ठरला. गुइलेन बॅरि सिंड्रोम आजारामुळे हा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएसमुळं हा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये पाण्यात कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळले नाहीत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आता या जीवाणूच्या स्वरूपाचे जनुकीय अनुवांशिकतेद्वारे विश्लेषण करणार आहे. यातून उद्रेकाची कारणे समोर येतील. हा जीवाणू किमान पाच रुग्णांच्या स्टूलच्या नमुन्यांमध्ये आढळून आला.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आता हे गूढ उकलण्यासाठी इतर मार्गांचा विचार करत आहे. दरम्यान, आणखी तीन प्रकरणांची पुष्टी झाल्याने जीबीएस रुग्णांची संख्या १३० झाली आहे. २० रुग्ण अजूनही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.
GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.
